नवी मुंबई येथील खारघरमध्ये नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संप्पन्न झाला. सोहळा सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत होता. सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचा पारा चढू लागतो. त्यात या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून लाखो लोक आले होते. त्यातील अनेक व्यक्तींना उष्माघाताचा त्रास झाल, ज्यामुळे 13 व्यक्ती मरण पावल्या तर 300 हून अधिकजणांना रुग्णालयात दाखल केले गेले. सध्या, महाराष्ट्रात संमिश्र वातावरण आहे, कुठे पाऊस, कुठे गारपीट तर कुठे कडाक्याचं ऊन.
 
गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर लक्षात येते की दरवर्षी उन्हाळ्यात पारा एक नवा रेकॉर्ड बनवत आहे. तापमानाचा पारा चढत्या क्रमाने जात आहे आणि याचा परिणाम मानवी शरिरासह, प्राणी, पक्षी, झाडं, शेती या सर्वांवर होत आहे. कराडमध्येही सध्या दुपारच्यावेळी पारा 37 अंशाच्यावर पोहोचत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. उन्हामुळे डिहायड्रेशन, हिट स्ट्रोक अर्थात उष्माघात आदींचा त्रास होऊ नये म्हणून काय करावं याबाबत, शारदा क्लिनिक एरम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपाय सांगितले आहेत. 

उष्माघात म्हणजे काय? (What is heatstroke?)

सातत्याने कडाक्याच्या उन्हात काम केल्यामुळे किंवा उन्हात खूप वेळ चालल्यावर किंवा काही कारणाने उन्हातच राहावे लागल्यामुळे उष्मापात होतो. मग त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात होय. शरिराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असंही म्हटलं जातं. रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यामुळं किंवा जास्तवेळ उन्हात थांबल्यामुळं शारिरातील उष्णता संतूलन संस्था काम करायची बंद होते, ज्यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होतो. 

उष्माघाताची लक्षणं काय आहेत? (Symptoms of heat stroke)

चक्कर येणं, डोकं दुखणं, सुस्ती आल्यासारखं वाटणं आणि डोकं हलकं झाल्यासारखं वाटणं, गरम होत असूनही घाम न येणं, त्वचा लालसर होणं, त्वचा कोरडी पडणं, अशक्तपणा जाणवणं, मळमळ होणं, उलट्या होणं, जोरात श्वास घेणं, हृदयाचे ठोके वाढणं आदी लक्षणं उष्मापातानंतर जाणवतात आणि पुढे उष्माघात होतो. 

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावं? (How to prevent heat stroke?)

  • रोज सकाळी योग करा, यात विशेषत: शीतली, शितकारी आणि वायूसार हे योगप्रकार करा. यासह इतर व्यायाम प्रकारही करा. मात्र उन्हाळ्यात अति व्यायाम करणं टाळा. 
  • दिवसभरात किमान दोन लीट पाणी प्या. घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवा. पाण्यात काकडीचे तुकडे किंवा सब्जा किंवा जिरे घालून ठेवा, जेणेकरून पाणी शरिरात थंडावा निर्माण करेल आणि उष्णतेचा त्रास होऊ देणार नाही. शक्य असल्यास घरी फ्रिजपेक्षा माठातील पाणी प्या. 
  • यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून सुरक्षा प्रदान करणारे, एसपीएफ 50 पेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन लावून घराबाहेर पडा. तसंच सोबत टोपी, सनग्लासेसचा वापर करा. स्कार्फ लावत असाल तर तो सुती कापडाचा असावा, जेणेकरून त्याचा त्त्वचेला त्रास होणार नाही. तसंच घट्ट कपडे न घालता, सैलसर, सुती कपडे घालावेत. पॉलिस्टर, व्हिसकोस, क्रेप, नायलॉन आदी मटेरीअलचे कपडे घालणं टाळावं.
  • या सिझनमध्ये अल्कोहल, एअरेटेड अर्थात सोडायुक्त पेय पिणं टाळा. याऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, मठ्ठा, ताक, कैरीचं पन्ह आदी पेय प्या. ही पेये शरिरातील तापमान संतुलित ठेवण्यात मदत करतात. भूक लागल्यावर बाहेर खाताना, त्या ठिकाणाची स्वच्छता पाहा. अति तेलकट, अति आंबट आणि अति गोड पदार्थ खाणं शक्य तितकं टाळावं. अशा पदार्थांमुळे उष्णता, पित्त वाढण्यास मदत होते. 
  • कलिंगड, टरबूज, बेल, ताडगोळे अशी फळे आवर्जुन खा. आंबे खाताना ते खाण्यापूर्वी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर त्याचे सेवन करा. आंब्यामधील उष्णता कमी करण्यासाठी असं करावं. 
  • रात्री झोपताना दूध प्या. त्या दुधात एक लहान चमचा गुलकंद घालून प्या. याव्यतिरीक्त, पाण्यात चहाची पात, आलं, पुदिना, तुळस आदी साहित्य घालून उकळा ते पाणी थंड करून घ्या. हे पाणी आणि दूध समान भागात घेऊन एकत्र करून प्या, यामुळे शरिरात थंडावा येईल. 

उष्माघात झाल्यास काय करावं? (First Aid for Heatstroke)

मित्र-मैत्रिणींनो शक्य असल्यास दुपारी 12 ते 3 यावेळेत उन्हात जाणं टाळा. परंतु शक्य नसल्यास वरील सर्व उपाय करा जेणेकरून उष्णतेचा कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. मात्र तुम्ही बाहेर गेलात आणि उष्माघाताचा त्रास सुरू झाल्यास, उन्हातून सावलीत किंवा वातानुकुलित जागेत बसावं, शरिरावरील शक्य तितके कपडे काढून अंग ओल्या कापडाने पुसावं. अशापरिस्थित आपल्याला शरिरातून उष्णता लवकरात लवकर काढणं आणि रक्ताभिसऱण सुरळीत ठेवणं गरजेचं असतं. 
Did you find this topic helpful?
?
Ask Question
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.