आज, 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्त्व दिवस. यानिमित्ताने महिलांनी गर्भारपणात स्वत:ची कशी काळजी घ्यावी, काय करावं आणि काय करू नये याबाबतच्या काही साध्या - सोप्प्या गोष्टी सांगितल्या आहेत.
 
घरात कोणी गरोदर स्त्री असेल तर घरात नुसती लगबग, गडबड, काळजी घेत राहणं आणि करत राहणं, विविध पदार्थ बनवणं, हास्यकल्लोळ आणि यासह विविध व्यक्तींकडून सल्ल्यांचा वर्षाव होत असतो. गरोदर स्त्रिने असं करावं, तसं करावं, हे करायचं नाही असं सतत तिला सांगितलं जातं. त्यामुळे तिला वीट येतो. पण मंडळी अनेक अनुभवी स्त्रिया तिचं गर्भारपण सोप्पं होण्यासाठी सांगत असतात, मात्र प्रत्येकिचा अनुभव वेगळा असतो. यासगळ्यात तज्ज्ञांनी, सुरक्षित प्रसुति होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत काय सांगितलं आहे, ते आपण जाणून घेऊयात. 

गर्भवती महिलांनी काय करावं? (Pregnancy Do’s)

  • स्त्रिच्या शरिरात पूर्वीपासून असलेले जीवनसत्त्व आणि इतर पोषक घटक हे पोटात वाढणाऱ्या बाळासाठी पुरेसे नसतात. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर मल्टिव्हिटॅमिनची औषधं देतात. यात, डीएचए, ईपीए, ओमेगा थ्री, फॉलिक अॅसिड, कॅल्शिअम, आयर्न आदी बाळासाठी आणि आईसाठी आवश्यक असलेली औषधं दिली जातात. ही औषधं न चुकता, नियमितपणे घेतली पाहिजेत.
  • गर्भवतीने घरचं ताजं अन्न खाल्लं पाहिजे. मात्र दोन जीवांची म्हणून कुटुंबीय विविध पदार्थ खायला देतात, नको - नको म्हणून अति खाल्लं जातं. तर, असं न करता आहारतज्ज्ञांकडून डाएट प्लॅन बनवून घ्यावा आणि त्यानुसार आहाराचं सेवन केलं तर अति वजन वाढणार नाही, तसंच गर्भावस्थेत होणाऱ्या आजारांनाही टाळता येऊ शकतं.
  • व्यायाम हा गर्भवतीसाठी महत्त्वाचा आहे. रोज व्यायाम केल्याने, स्नायू दुखी, पाय दुखी काही अंशी बरी होऊ शकते. निद्रानाशेची समस्या दूर होईल. अतिप्रमाणात वजन वाढणार नाही, मूड स्विंग्जचं प्रमाण घटेल. यासह, व्यायामामुळे स्ट्रेन्थ वाढेल, याचा फायदा अनेक गर्भवतींच्या प्रसुतिच्यावेळी जाणवतो. त्यामुळे रोज कोणत्याही प्रकारचा व्यायाम, योग हे सर्टिफाईड प्रशिक्षकांच्या अंतर्गत करा. 
 
  • गरोदरपणात, हार्मोन लेव्हल बदलते, विविध विचारांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. तसेच, या काळात थकवा येतो, अशावेळी वामकुक्षी घ्यावी. रोज नियमितपणे 8 तासांची झोप घेतली पाहिजे. 

गर्भवती महिलांनी काय करू नये? (Pregnancy Don’ts)

  • सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गर्भवतीने सिगारेट,तंबाखूपासून दूर राहिलं पाहिजे. यासोबत, अल्कोहलच सेवन थांबवलं पाहिजे. जर हे सेवन कमी-अधिक प्रमाणात सुरू ठेवलं, तर याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. बाळाचं वजन प्रमाणापेक्षा कमी होऊ शकते, बाळाची वाढ-विकास खुंटू शकते याशिवाय, बाळामध्ये लर्निंग डिसॉर्डर, बिहेविअरल प्रॉब्लेम आदी सायकॉलॉजिकल समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते.
  • गर्भवतीने रोज मांसाहार करणं टाळलं पाहिजे. घरी शिजवलेले मासे, चिकन खाता येईल. मात्र फ्रोजन फ्राईड खाणं टाळा. शिवाय, कमी शिजलेलं किंवा कच्च अन्न खाऊ नका. तसंच, दुधाचं सेवनही कच्च करू नका, आधी दूध उकळवून घ्या. चहा, कॉफी पिण्याची सवय असेल तर ते प्यावं, पण त्याचे प्रमाण 2 ते 3 कप एवढंच असावं. 
  • घरी पाळीव प्राणी असेल तर त्यांना साफ करणं, त्यांची विष्ठा साफ करणं हे काम करू नका. प्राण्यांसोबत वेळ घालवा, खेळा मात्र सफाईची कामे टाळा. 
 
अशाप्रकारे, तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केलं तर सुरक्षित प्रसुति होण्यास मदत होईल. सुरक्षित मातृत्त्वासाठी, सुरक्षित प्रसुति खूप गरजेची आहे. 
Normal Pregnancy - Sharada Clinic Erram Multispeciality Hospital
Did you find this topic helpful?
?
Ask Question
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.