?
Ask Question
शारदा क्लिनिक एरम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड व प्राथमिक आरोग्य केंद्र, केरळ ता. पाटण जि. सातारा यांचे संयुक्त विद्यमाने  मा. श्री बाळासाहेब पाटणकर यांचे वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मा. श्री. विक्रमसिंहजी पाटणकर (माजी सार्व. बांधकाम व पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर मा. श्री. विक्रमसिंहजी पाटणकर दादा व मा. डॉ. सुभाष एरम साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर शिबिरामध्ये केर परिसरातील ३०० हून अधिक लोकांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन शिबीराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये शारदा क्लिनिक एरम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड चे  मा. डॉ. सुभाष एरम साहेब, मेडिकल डायरेक्टर डॉ. चिन्मय एरम, मॅनेजिंग डायरेक्टर सौ. रोहिणी एरम, डॉ. संजय भागवत,  डॉ. सचिन निर्मळ, डॉ. संदिप तांदळे,  डॉ. पूजा लोखंडे, डॉ. तेजस्विनी चव्हाण यांनी उपस्थितांना विविध प्रकारच्या आजाराविषयी मार्गदर्शन करून त्यांची तपासणी केली. तसेच मा. श्री. राजेश पवार, मा. श्री. राजाभाऊ शेलार, मा. सौ. उज्वला जाधव, मा. श्री. दिनकरराव घाडगे, मा. श्री. शंकरराव जाधव, मा. श्री. राजाभाऊ काळे, मा. श्री. बापुराव जाधव, मा. अॅड. श्री. अविनाश जानुगडे व मा. श्री. सुभाष पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
Free Health Checkup Camp
Free Health Checkup Camp
Free Health Checkup Camp
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer