?
Ask Question
Press Note: सद्यस्थितीत मिनीमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेची (किमान छेद करणाऱ्या हृदय शस्त्रक्रिया) रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात निवडल केल्याचे दिसून येत. आहेमिनिमल इन्व्हेसिव्ह ही हृदयाची शस्त्रक्रिया हा विविध प्रकारच्या हृदयरोगाशी सामना करण्यासाठी व्यापकपणे वापरला जाणारा सुरक्षित असा पर्याय आहे. दुर्लक्ष केल्यास हृदयाच्या समस्या, हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल्युअर सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि वेळीच उपचार न केल्यास ते घातक ठरू शकतात. 
 
ओपन-हार्ट शस्त्रक्रियेशी तुलना करता, कमीत कमी आक्रमक (किमन छेद) हृदय शस्त्रक्रिया कमी वेदना आणि रुग्णांना जलद दैनंदिन आयुष्य सुरुवात करण्यात मदत करते. कऱ्हाड येथील शारदा क्लिनीक एरम हॉस्पीटल येथील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ किशोर देवरे सांगतात की , पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेने मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिअॅक सर्जरीचे अनेक फायदे असतात. अशा शस्त्रक्रियेमध्ये चिरफाड करावी लागत नाहीत, वेदना देखील कमी होतात.  या रुग्ण वाहन चालविणे आणि इतर अनेक क्रिया करू शकतात, रक्तस्त्राव किमान असल्याने बहुतांश रुग्णांना ब्लड ट्रान्सफ्युजनची देखील गरज भासत नाही आणि रक्तस्त्रावामुळे होणारे संसर्गही टाळता येतो. त्यामुळे संसर्गाला प्रतिकार करण्याची क्षमता कमी असलेल्या मधुमेही आणि वृद्धांसाठी ही शस्त्रक्रिया आदर्श ठरते.
 
या प्रकारच्या हृदय शस्त्रक्रियेची प्रत्येकासाठी शिफारस केलेली नाही. तुमचे डॉक्टर याबाबत योग्य तो निर्णय घेतील, तुमच्या वैद्यकीय इतिहासाचे मूल्यमापन करतील आणि मगच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करावी की नाही हे ठरविले जाईल. शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून आपल्याला ते करण्याचा सल्ला दिला जातो. छातीच्या डाव्या  किंवा उजव्या बाजूला ६-७ सेंटीमीटर एवढा छोटा छेद देऊन केली जाणारी मिनिमली इन्व्हेसिव्ह बायपास शस्त्रक्रिया हा अलीकडील काळात निर्माण झालेला पर्याय बहुतेक रुग्णांबाबत लाभाचा ठरत आहे. या प्रकारात रक्तस्त्राव तसेच वेदना तर कमी होतातच, शिवाय रुग्णाची प्रकृती जलद गतीने पूर्वपदावर येते. तसेच यात प्रादुर्भावाचा धोका जवळपास नसतो. साधारणपणे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ३ दिवसांत घरी जाण्यास परवानगी देण्यात येते.
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Site-Help | Disclaimer